#भाजप नगरसेविका जागृती पाटील यांनी शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं.जागृती पाटील यांनी शिधावाटप केंद्रांवर मिळत असलेले निकृष्ट दर्जाचे गहू अधिकाऱ्यांच्या टेबलावर ओतले.'या निकृष्ट दर्जाच्या गव्हामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.नागरिकांना उलट सुलट उत्तर दिली जातात.अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे गहू शिधावाटप केंद्रांवर कसे येतात?'असे अनेक प्रश्न विचारत अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला.तसेच केंद्रांवर कार्यवाही करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.गव्हात रेती आणि खडी मोठ्या प्रमाणात असल्याची तक्रार करण्यात आली.
जागृती पाटील आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.